नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

उपकेंद्राजवळील आग थोडक्यात आटोक्यात


पनवेल, दि.3 (वार्ताहर)4kNews ः पनवेल उरण रोडवरील विद्युत वितरण कंपनीच्या उपकेंद्राजवळील मोकळ्या जागेत लागलेली आग थोडक्यात आटोक्यात आणल्याने पनवेल अंधारात जाता जाता वाचले.
पनवेलमध्ये उरण नाका येथे महावितरण चे उपकेंद्र आहे.त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगली झाडे वाढली आहेत

.त्या उपकेंद्राच्या आवारात आजूबाजूचे नागरिक कचरा देखील टाकतात.उपकेंद्र असल्यामुळे भूमिगत विद्युत तारा देखील तेथून गेल्या आहेत.त्याठिकाणी अशाच मोकळ्या जागी कचरा टाकण्यात आला होता.अचानक या कच-याजवळ आग लागली

.ती आग वाढू लागली.या आगीने रौद्र रूप धारण करण्यापूर्वीच जागरूक नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला संपर्क साधला.अग्निशमन दलाचे जवान काही क्षणातच सदर ठिकाणी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली.ही आग आटोक्यात आणली नसती तर भूमिगत विद्युत तारांना आग लागली असती.त्यामुळे पूर्ण पनवेल शहर अंधारात जाण्याची शक्यता होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top