नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेनंतर अवघ्या ४ तासांत रुग्ण स्वतःच्या पायांवर उभा

कोविड संसर्गाच्या व्यवस्थापनाकरिता स्टिरॉइड्सचा वापर केलेल्या रुग्णाला एव्हॅस्कुलर नेक्रोसिस चे (AVN) झाले निदान

नवी मुंबई: कोविड संसर्गाच्या झाल्यानंतर त्याच्या व्यवस्थापनाकरिता स्टिरॉइड्सचा वापर करुन एव्हॅस्कुलर नेक्रोसिसचे (AVN) झाले निदान झालेल्या ४५ वर्षीय रुग्णावर खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटलमधील यशस्वी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑर्थोपेडिक मेडिसिन चे संचालक डॉ. दीपक गौतम यांच्या नेतृत्वाखालील टीमने पहिल्यांदाच अशा प्रकरणात टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली असून शस्त्रक्रियेनंतर अवघ्या चार तासातच रुग्ण वेदनारहित चालू लागला तसेच शस्त्रक्रियेच्या २४ तासांत रुग्णाला घरी सोडण्यात आले.

नवी मुंबईत राहणाऱ्या ४५ वर्षीय महेश ढवळीकर हे हॉटेल क्षेत्रात नोकरी करतात, एक वर्षाहून अधिक काळ त्यांना चालण्यास त्रास होत होता. अनेक डॉक्टरांची मदत घेतली आणि वेदनाशामक औषधांसह विविध औषधे वापरूनही त्याला पुरेसा आराम मिळाला नाही. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांनी नवी मुंबईतील मेडिकवर रुग्णालयात उपचार घेण्याचा निर्णय घेतला.

डॉ. दीपक गौतम (मेडिकवर हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक मेडिसिन चे संचालक )पुढे सांगतात की, अव्हॅस्कुलर नेक्रोसिस (एव्हीएन) किंवा ऑस्टिओनेक्रोसिस म्हणजे रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हाडांच्या ऊतीं निकामी होतात. यामुळे हाडांचे लहान तुकडे होतात आणि हाड ठिसूळ होते. स्टिरॉइड्सचा दीर्घकाळ वापर, जास्त मद्यपान, नितंबाची दुखापत आणि इतर वैद्यकीय परिस्थितींमुळे एव्हीएन सारखी समस्या उद्भवते. या रुग्णाला मात्र कोविडची लागण झाल्यानंतर स्टिरॉइड्सचा अति वापर केल्याने ही समस्या उद्भवली होती.सर्व पारंपरीक उपचार पर्याय अयशस्वी झाल्यानंतर, टोटल हिप रिप्लेसमेंट (THR) हा एकमेव पर्याय उरतो. इतर कोणतेही आजार नसल्याने हा रुग्ण या शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरला. रुग्णाने ओपीडीच्या माध्यमातून सर्व प्री-ऑपरेटिव्ह तपासणी केली जी सामान्य असल्याची आढळून आली.डॉ. दीपक गौतम सांगतात की, शस्त्रक्रियेमध्ये खराब झालेले हाड आणि कूर्चा काढून टाकणे आणि त्याऐवजी कृत्रिम घटकांचा वापर केला जातो. हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेसाठी निवडलेल्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये 2-3 दिवसांसाठी दाखल केले जाते ज्यामुळे रुग्णावर आर्थिक भार तर वाढतोच पण हॉस्पिटलमध्ये राहिल्याने मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आणि संसर्गाचा धोका असतो.

पारंपारिक हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेदरम्यान, पोस्टरीअर पध्दतीद्वारे नितंबाच्या मागील भागातील सांध्याचा वापर केला जातो. आम्ही भारतातील नवीन तंत्राद्वारे केवळ टोटल हिप रिप्लेसमेंट करण्याचे ठरविले यामध्ये डायरेक्ट एंटिरियर ॲप्रोच (DAA) असल्याने रुग्णांना हॉस्पिटलमध्ये कमीतकमी कालावधीकरिता राहावे लागते. यामागचे कारण असे आहे की ही शस्त्रक्रिया कोणताही स्नायू न कापता केली जाते, त्यामुळे वेदना खूप कमी होतात आणि ऍनेस्थेसियाचा प्रभाव संपल्यानंतर रुग्णाची हालचाल पुर्ववत सुरू होते. यामध्ये कमी वेदना, रक्तस्राव कमी होणे आणि हिप डिस्लोकेशनची शक्यता कमी असणे यासारखे इतर फायदे आढळून येतात. या नवीन तंत्रामुळे, रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर कोणत्याही सावधगिरीचे पालन करावे लागत नाही जे पारंपारीक शस्त्रक्रियेमध्ये अनिर्वाय होते. रुग्णाला 28 तारखेला सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि शस्त्रक्रियेनंतर अवघ्या ४ तासांच्या आत तो पोस्ट ऑपरेटिव्ह रूमच्या कॉरिडॉरमध्ये फिरू लागला. त्याला शस्त्रक्रियेनंतर २४ तासांत घरी सोडण्यात आल्याची माहित डॉ दीपक गौतम यांनी दिली.

चालताना होणाऱ्या तीव्र वेदनांमुळे माझे जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते आणि त्यामुळे माझी शांतता हिरावून घेतली. साधी दैनंदिन कामेही मला त्रासदायक वाटू लागली. सुदैवाने, मला मेडिकवर हॉस्पिटलमध्ये त्वरित उपचार मिळाले. डॉ. दीपक गौतम आणि त्यांच्या टीमने प्रसंगावधान राखत उत्तम काम केले. मी आता पुर्वीसारखा चालू फिरू शकेन आणि मला अशक्य वाटणाऱ्या दैनंदिन क्रिया देखील मी पुर्ववत करु शकेन अशी प्रतिक्रिया रुग्ण श्री महेश ढवळकर यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top