पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ , पनवेल यांचे वार्षिक स्नेहसंमेलन पनवेल येथील फडके नाट्यगृहात संपन्न झाले. डॉ. भगवान बिरमोळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच शेकाप नेते प्रीतम म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणिस गणेश कडू, उद्योजक मंगेश परुळेकर, सिंधुदुर्ग येथील अभियंता अजयकुमार सर्वगौड, युवा नेते मंगेश अपराज, आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी येथील महिलांनी आयोजित केलेल्या कोकणचो रुबाब भारी या नाटकाने उपस्थितांची मने जिंकली

याप्रसंगी संस्थेच्या वाटचालीमधे मोलाचे योगदान दिलेल्या सभासदांचा सन्मान करण्यात आला. रमाकांत चव्हाण व संजय साटम याना ’जीवन गौरव’ आणि पत्रकार संजय कदम याना ’सिंधुरत्न’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.यशस्वी युवा उद्योजक आणि क्रीडा क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.

यंग आणि सिनियर महिला सदस्यांचा फ्युजन डान्स नंतर कोकणचो रुबाब भारी’ हे मालवणी नाटक प्रिया खोबरेकर आणि प्रिता भोजने यांनी विशेष मेहनत घेऊन सादर केले.सदर नाटकाला प्रेक्षकांनी टाळ्यांनी आणि हास्यकल्लोळ करून भरभरून दाद दिली.

प्रसन्नकुमार घागरे दिग्दर्शित भव्यदिव्य वारकरी दिण्डीने कार्यक्रमाची सांगता झाली. श्रीनिवास काजरेकर आणि वैभवी मराळ याच्या निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. संघाचे अध्यक्ष केशव राणे, सचिव रामचंद्र मोचेमाडकर,संतोष चव्हाण,प्रिया खोबरेकर व कार्यकारिणी सदस्य,कार्यकर्त्यानी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान
