नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

संन्यस्त खड्ग’ नाटकाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा इशारा; पनवेलमध्ये प्रयोग थांबवण्याची मागणी

4k समाचार दि. 23

पनवेल/रायगड (प्रतिनिधी) – वि. दा. सावरकर लिखित ‘संन्यस्त खड्ग’ या नाटकाच्या प्रयोगाविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा तीव्र भूमिका घेतली आहे. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके सभागृहात हा प्रयोग होणार आहे. तथागत गौतम बुद्ध यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप करीत या नाटकाला विरोध दर्शविण्यात आला आहे.



यापूर्वी पुणे व मुंबईत आंदोलनानंतर हे प्रयोग बंद करण्यात आले होते. त्याच धर्तीवर रायगड जिल्ह्यातही हा प्रयोग होऊ देणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
२२ सप्टेंबर रोजी पनवेल महानगराध्यक्ष आनंद गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त वैभव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त ढोले व ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाटकाचा प्रयोग रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. अन्यथा, प्रयोगस्थळी आंदोलन करून तो उधळून लावू असा इशारा देण्यात आला.



या प्रसंगी महासचिव अविनाश आडांगळे, संतोष मुजमूले, उपाध्यक्ष छाया शिरसाठ, कविता सोनावणे, लता सोनावणे, नवीन पनवेल शहराध्यक्ष शिवाजी साळवे, महासचिव किरण सोनावणे, खारघर शहराध्यक्ष राहुल वानखडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले की, “छत्रपती शिवरायांची पवित्र भूमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची क्रांतिभूमी असलेल्या रायगड जिल्ह्यात बौद्धांचा अपमान करणारे प्रयोग कदापि सहन केले जाणार नाहीत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top