पनवेल दि. १७ ( वार्ताहर ) : पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून चोरलेली रिक्षा पनवेल शहर पोलिसांनी सराईत रिक्षा चोराकडून हस्तगत केली आहे .

पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संतोष भोपी यांनी त्यांची ५०,०००/- रुपये किमतीची रिक्षा येथे उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने ती रिक्षा चोरून नेल्याने या बाबतची तक्रार त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनखाली सपोनि प्रवीण फरतडे,पोहवा म्हात्रे,पोहवा बोरसे,पोना भोसले,पोशि दुधे ,पोशि कराड आदींच्या पथकाने सदर चोराचा शोध घेण्यास सुरुवात

तांत्रिक तपास व गुप्तबातमीदाराच्या मदतीने सुरु केला असता आरोपी अक्षय नरेश चव्हाण (वय 22 )
रा. काशीबाई झोपडपट्टी याची माहिती मिळाली त्याला चोरीच्या रिक्षासह ताब्यात घेऊन पो उपनिरीक्षक संजय अस्पतवार यांच्या ताब्यात देण्यात आले आहे .
