मुलीला उचलल्यानंतर छातीत आली कळ; न्यूमोथोरॅक्सवर यशस्वी कीहोल शस्त्रक्रिया


4kNews कामोठे दि. 18
रोहा : केरळमध्ये कुटुंबासोबत सुट्टीवर गेलेल्या ३२ वर्षीय आसिफ शेख यांना मुलीला उचलल्यानंतर अचानक छातीत तीव्र वेदना आणि श्वास घेण्यास त्रास झाला. सुरुवातीला स्नायूंवरील ताणामुळे त्रास झाल्याचे वाटले; मात्र तपासणीत डाव्या फुफ्फुसात मोठ्या प्रमाणात हवा साचून न्यूमोथोरॅक्स झाल्याचे आढळले. ६ जून २०२६ रोजी ते खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. 



एचआरसीटी स्कॅनमध्ये डाव्या फुफ्फुसाचा मोठा भाग आकुंचन पावल्याचे आणि हृदय व छातीतील संरचना उजव्या बाजूला सरकल्याचे दिसून आले. ऑक्सिजन पातळी ८६ टक्क्यांवर होती. डॉक्टरांनी पिगटेल कॅथेटरद्वारे हवा बाहेर काढली; मात्र नळी काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर फुफ्फुस पुन्हा आकुंचन पावत होते. 



डॉ. शाहिद पटेल, डॉ. तनय सिन्हा आणि थोरॅसिक सर्जन डॉ. प्रिया एशपुनियानी यांच्या टीमने उपचार केले. ऑटोलॉगस ब्लड पॅचचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर १९ जून रोजी VATS बुल्लेक्टॉमी व प्ल्युरेक्टॉमी ही ‘कीहोल’ शस्त्रक्रिया करण्यात आली. फुफ्फुसावरील ‘बुल्ला’ काढण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर झालेला कायलोथोरॅक्स आहार व पोषणात्मक उपचारांनी नियंत्रणात आणण्यात आला. उपचारानंतर आसिफ यांचे फुफ्फुस पूर्ववत झाले असून पुन्हा न्यूमोथोरॅक्स झालेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top