नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

घारापुरी ग्रामस्थांना कायमस्वरूपी कटलरी दुकाने मिळावीत म्हणून ग्रामपंचायत घारापुरीचे वतीने खासदार श्रीरंग बारणे यांना दिले निवेदन.


उरण दि २(विठ्ठल ममताबादे ) दिनांक ०२/०६/२०२५ रोजी खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती उरण येथे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत घारापुरी यांचे वतीने विविध समस्या सोडविण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
१) घारापुरी हे बेट असल्याने येथील ग्रामस्थ कटलरी दुकाने लाऊन उपजीविका चालवतात. मात्र महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या कडून वारंवार दुकाने हटवण्यासाठी नोटिसा देतात. त्यामुळे ग्रामस्थांना कायमस्वरूपी दुकाने मिळाल्यास सदरचा प्रश्न निकाली निघेल.


२) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या मार्फत घारापुरी घारापुरी बेटाचा विकास आराखडा तयार केला असून त्याप्रमाणे विकास कामे सुरू आहेत. मात्र भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने सदरच्या कामांना मंजुरी देत नसल्याने कामे होत नाहीत.


३) घारापुरी येथे विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्यास गावाचा विकास होईल.
अशा मागण्यांचे निवेदन घारापुरी ग्रामपंचायतच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांना देण्यात आले.यावेळी तहसीलदार उद्धव कदम , गट विकास अधिकारी समीर वाठारकर , सर्व विभागाचे अधिकारी, घारापुरी ग्रामपंचायतचे सरपंच मीना भोईर,उपसरपंच बळीराम ठाकूर,सदस्या अरुणा घरत, हेमाली म्हात्रे,नीता ठाकूर, भारती पांचाळ आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.घारापुरीसाठी शासनाकडून विकास कामांसाठी मोठा निधी दिला आहे आणि यापुढेही देणार.तसेच येथील कटलरी दुकानदारांची दुकाने हटविणार नाही अशी हमी खासदार श्रीरंग बारणे यांनी घारापुरी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top