नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी २५  दिव्यांगाना दिला मदतीचा हात.



उरण दि २(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्ह्यामधील उरण तालुक्यामधील दिव्यांग मित्र म्हणून सुप्रसिद्ध असणारे सर्वांचे लाडके माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी १ जून २०२५ रोजी उरण तालुक्यातील  २५ दिव्यांग बांधवांना प्रत्येकी २० हजार रुपयांचा धनादेश दिला आहे .

प्रत्येक दिव्यांग स्वतःच्या पायावर उभा राहावा असे त्यांचे मत आहे.  या करिता त्यांना व्यवसायासाठी मदत मिळावी म्हणून दरवर्षी दिव्यांग बांधवांना ते मदत देत आहेत. प्रत्येक दिव्यांग स्वबळावर उभा राहावा, स्वतःचा व्यवसाय करावा, असे त्यांचे म्हणणे आहे. माजी आमदार जेव्हा प्रत्यक्ष आमदार होते त्यावेळेस त्यांच्या आमदार निधीतून सदर निधी वाटप करत होते. आत्ता त्यांना मिळणाऱ्या पेन्शन मधूनही हे निरंतर चालू ठेवले आहे.

दिव्यांग बांधवांप्रती असणारी आपुलकी आणि प्रेम यामुळे त्यांना दिव्यांग स्वर्गीय महादेव रामदास पाटील
(मामा) यांनी माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांना ‘दिव्यांग मित्र’  ही उपाधी दिली.त्याचबरोबर सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी उरण तालुक्यातील प्रत्येकाला मनोहर शेठ भोईर यांनी आवाहन केले होते की एकमेकांना मदत करा. गोर गरिबांची सेवा करा. एकमेकांच्या अडचणी सोडवा.

एकजूट हाऊन समस्या सोडवा असे आवाहन केले.याचाच आदर्श घेत ‘आई फाउंडेशनचे’ दिव्यांग संदेश राजगुरू आणि महेश पाटील यांनी १०० पेन शैक्षणिक साहित्य म्हणून वाटप केले.या कार्यक्रमा मुळे प्रत्येकाला प्रेरणा मिळाली की आपण आपले दैनंदिन जीवन जगत असताना मदतीचा हात द्यायला पाहिजे जेणेकरून तळागाळातील गरीब गरजू कुटुंबांपर्यंत आणि दिव्यांगांनाही मदतीचा हात मिळेल.


 माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला दिव्यांग सामाजिक संस्था उरण यांच्या सभासदांनीही मोलाचे सहकार्य दिले. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी उरण तालुक्यातील दिव्यांग मानसी विजय गावडे हिने बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून प्राविण्य मिळवले त्याबद्दल तिला ‘दिव्यांग सामाजिक संस्था उरण’ कडून शैक्षणिक साहित्य देण्यात आले.


   सदर कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कारण दिव्यांग मित्र माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी केलेल्या दिव्यांगांसाठी मदतीचा हात या कार्यक्रमाचे नक्कीच प्रत्येक दिव्यांगाला सक्षम करण्यासाठी उपयोगी ठरेल.संपूर्ण महाराष्ट्रात असा एकमेव आमदार आहेत जे अगोदर आपला संपूर्ण पगार व आता निवृत्ती झाल्यानंतर म्हणजेच माजी आमदार झाल्या नंतर सर्व पेन्शन दिव्यांग बांधवाना देतात. म्हणून माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top