पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणीने प्रेरित होऊन व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या व माझ्या मार्गदर्शनाखाली तळोजा शहराचे शहर प्रमुख विशाल पवार व घोटगाव चे विभाग प्रमुख आशिष हवालदार यांच्या संकल्पनेतून पनवेल विधानसभा भागातील तळोजा शहर मधल्या घोटगाव च्या युवकांनी शिवसेना मध्ये पक्ष प्रवेश केला.

यावेळी रायगड जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम कळंबोली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाला. यावेळी आकाश हवालदार, कुलदीप सिंह, दीपक चव्हाण, सुशांत गाडे, जाफर अन्सारी, शहजाद शेख, पवन गुप्ता, अमित निषाद, मुकेश तायडे, श्रीनाथ मुत्तू, कवलजीत बमराह, मोहित वर्मा, रोनक परमार, स्वप्नील महाडीक, यतिन कवैतकर, सूरज सिंह, संभाजी जरग, राहुल वाघमारे, परमिंदर सिंह, मनिंदर सिंह, विलास बिन्नर, पुष्कर ठाकूर आदी तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला.
