नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

नवी मुंबई पोलिसांची धडक कारवाई : वेश्याव्यवसायातून २ महिलांची सुटका, ३ आरोपी अटकेत

4k समाचार दि. 23
नवी मुंबई : पोलीस आयुक्त श्री. मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त श्री. संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. दीपक साकोरे व पोलीस उप आयुक्त (गुन्हे शाखा) श्री. सचिन गुंजाळ यांच्या आदेशानुसार शहरातील अनैतिक व्यापार व अवैध धंद्यांवर गुन्हे शाखेकडून सतत कारवाई सुरू आहे.



त्याच मोहिमेअंतर्गत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना २० नोव्हेंबर २०२५ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एपीएमसी, सेक्टर १९/सी येथील श्रीनिधी हॉटेल अॅण्ड लॉजिंग येथे धाड टाकण्यात आली.
कशी उघडकीस आली कारवाई?
गुप्त बातमीदाराच्या माहितीप्रमाणे, लॉज मॅनेजर ग्राहकांना महिलांची निवड करून देत होता व वेश्यागमनासाठी ग्राहकाकडून ५,००० रुपये घेत होता. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. सांकेतिक खूण मिळताच पथकाने लॉजवर छापा टाकला. त्यावेळी दोन पीडित महिलांना वेश्याव्यवसायासाठी ठेवण्यात आल्याचे समोर आले. 



अटक केलेले आरोपी —

1. मॅनेजर मस्तराम रामस्नेही कनोजिया (वय 29)
2. वेटर विशाल अवद यादव (वय 23)

3. महिला पुरवणारा सोनू उर्फ शाहीम हुसेन मंडल (वय 28)
तर लॉज मालक रघु अण्णा (नाव-पत्ता अपूर्ण) हा फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.
छाप्यात उघड झाले की, आरोपींनी संगनमत करून दोन्ही महिलांना लॉजमध्ये ठेवले होते. बनावट ग्राहकाने एक महिला निवडल्यावर मॅनेजरने ४,५०० रुपये मोबदला म्हणून स्वीकारल्याचेही समोर आले.



गुन्हा दाखल —
आरोपींवर भा.न्या.सं. कलम 143(3), 3(5) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 3, 4, 5 अंतर्गत एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन आरोपींना अटक करून त्यांना २४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कारवाई करणारे पथक —
सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई वपोनि. पृथ्वीराज घोरपडे, सपोनि योगेश देशमुख, सपोनि राजश्री शिंदे, पोउपनिरीक्षक सरिता गुडे, तसेच पोलिस कर्मचारी मांडोळे, ठाकूर, चव्हाण, कोलते, पारासुर, चव्हाण, अडकमोल, पावडे, अनिता भोये व चालक पोहवा मोहिते यांनी केली.
नवी मुंबई पोलिसांच्या या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे दोन महिलांची सुटका होऊन आणखी एका अनैतिक धंद्याला आळा बसला आहे. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top