पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक विवाहिता कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार तिच्या पतीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

माधुरी सुभाष सहानी (18 रा.तक्का) उंची साडे चार फुट, रंग गोरा, केस काळे, डोळे काळे, नाक सरळ, चेहरा उभट, बांधा सडपातळ, सोबत मोबाईल फोन आहे. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक संजय अस्पतराव यांच्याशी संपर्क साधावा.
