शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार श्री. आदित्यजीसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, शिवसेना – युवासेना सचिव श्री. वरूनजीसाहेब सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तथा युवासेना विस्तारक श्री. विनयजी सातले यांच्या सूचनेनुसार आज अवैध्य होर्डिंगच्या विरोधात युवा सेनेने महापालिका अतिरिक्त आयुक्त श्री. गणेशजी शेटे यांची युवा सेना जिल्हाधिकारी श्री. परागजी मोहिते यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना शिष्टमंडळाने भेट घेतली.

वाढत चाललेल्या राजकीय व व्यावसायिक जाहिरातींच्या स्पर्धेत अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स आणि पोस्टर्सचा विळखा पनवेलच्या सौंदर्यावर, शिस्तीवर आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम करत आहे.
घाटकोपर, पुणे आणि कल्याणमध्ये अवाढव्य बॅनर कोसळून झालेल्या जीवित तसेच आर्थिक हानीच्या घटना ताज्या असतानाही पनवेल शहरात महाकाय होर्डिंग्जना जाहीरपणे अभय मिळत आहे. या फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून जागोजागी अवैधरित्या केलेली बॅनरबाजी रस्त्यावरही चालणाऱ्या लहान वाहनांनाही धोका निर्माण करत आहेत. तसेच अनाधिकृत बॅनरच्या माध्यमातून महापालिकेचा लाखोचा महसूल बुडत असून पालिका कर्मचाऱ्यांचा जाहिरात कंपन्यांना अजिबात धाक राहिलेला नाही..

यावर युवासेनेने काही प्रश्न महापालिकेला विचारलेले आहेत.
१. आर्थिक वर्ष २०२४ – २५ मध्ये महापालिकेने किती अनाधिकृत बॅनरवर कारवाई केली? तसेच किती फौजदारी गुन्हे दाखल केले?
२. आजपर्यंत महापालिकेने किती अनाधिकृत होर्डिंग्ज काढले आणि ते उभे करणाऱ्या जाहिरातदार/व्यक्तींवर कोणती कारवाई केली?
३. ४० फुटांपेक्षा अधिक मोठे होर्डींग्ज कोणत्या निकषांवर उभे करण्यास परवानगी देण्यात आली? त्यासाठी महापालिकेने परवानगी दिली नसल्यास आजवर कारवाई का करण्यात आली नाही?

चर्चेदरम्यान युवासेनेने वरील सर्व विषयांचा गांभीर्याने निर्णय घेऊन तातडीने ४० फुटांपेक्षा जास्त मोठे होर्डिंग तातडीने काढणे, सर्व ४०×४० बॅनरचे ऑडिट करणे, अनधिकृत होर्डिंग वरती कायमस्वरूपी चाप बसवणे तसेच महानगर क्षेत्रातील महामार्गावरील उड्डाणपूल आणि विद्युत खांब्यांवर बांधलेल्या जाहिरातींना परवानगी नाकारणे आदी मागण्या केल्या. सोबतच अनधिकृत बॅनर तसेच होर्डिंग वर केलेल्या कारवाईचा तपशील महापालिकेच्या वेबसाईटवर जाहीर करण्याची मागणीही शिवसेनेने केली.

अतिरिक्त आयुक्तांशी झालेल्या चर्चेत महाराष्ट्र वाहतूक सेना राज्य चिटणीस श्री. विलासजी कामोठकर, शिवसेना पनवेल शहर प्रमुख श्री. प्रविणजी जाधव, महाराष्ट्र वाहतूक सेना रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. महेशजी गुरव, विधानसभा समन्वयक श्री. अरविंदजी कडव, युवासेना तालुका अधिकारी श्री. मनोजजी कुंभारकर, तालुका चिटणीस श्री. अजयजी पाटील, महानगर समन्वयक श्री. जयजी कुष्ठे, शिवसेना पनवेल उपशहर प्रमुख श्री. रोहितजी (सनी) टेमघरे, प्रभाग क्रमांक १८ विभागप्रमुख श्री. अमितजी माळी, कळंबोली उपविभागप्रमुख श्री. तुषारजी निढाळकर आणि नविन पनवेल शहर चिटणीस श्री. सृजन जोशी आदी उपस्थित होते.
