4kNews कामोठे
पनवेल, दि. 9(वार्ताहर) : माँसाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेविका प्रगती कैलास पाटील यांच्या पुढाकाराने तळोजा येथे आयुष्मान कार्ड व आभा कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शासकीय आरोग्य योजनांचा लाभ नागरिकांना सहज मिळावा, तसेच डिजिटल आरोग्य नोंदणीला चालना मिळावी, या उद्देशाने शिबिर घेण्यात आले. यावेळी नागरिकांना आयुष्मान व आभा कार्डबाबत मार्गदर्शन करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आली. ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
शिबिराच्या आयोजनासाठी कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल प्रगती पाटील यांनी आभार मानले.

