4kNews कामोठे 26
पनवेल (प्रतिनिधी) : पत्रकारिता क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या कार्यक्रमात मंचाचे सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या हस्ते कदम यांचा गौरव करण्यात आला.

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्या वतीने मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रश्न, जनसामान्यांच्या समस्या आणि विविध सार्वजनिक विषयांना सातत्याने वाचा फोडली आहे.

यावेळी मंचाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, ज्येष्ठ पत्रकार निलेश सोनावणे, उपाध्यक्ष दत्तात्रेय कुलकर्णी, सचिव हरेश साठे, सदस्य प्रविण मोहोकर, लालचंद यादव आदी उपस्थित होते. उपस्थित पत्रकारांनी संजय कदम यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

