नवीन बातम्या
अभियंता प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी आमदार प्रशांत ठाकूर भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर; पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन
जीवनगौरव पुरस्काराबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा सत्कार पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने शासकीय विश्रामगृहात गौरव
नवीन शेवा व शेवा कोळीवाडा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार.
रेट्रोफिटिंग कामांचा थकीत निधी द्या; पाणीपुरवठा कंत्राटदारांचे आझाद मैदानात बेमुदत धरणे
४८ तासांत ६६ तोळे सोने हस्तगत; आरोपी सोलापुरातून ताब्यात
कर्ज देण्याच्या आमिषाने ऑनलाइन फसवणूक करणारी टोळी जेरबंद चार आरोपी अटकेत; ३.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
जन्म-मृत्यू विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
माहितीच्या अधिकारात अपील करताच दाखला मिळाल्याचा अर्जदाराचा दावा
स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचा १२वा वर्धापनदिन उत्साहात  गुरुपौर्णिमा उत्सवात विद्यार्थ्यांचा बहारदार कलाविष्कार
सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन सराईत आरोपी अटकेत
७.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच गुन्ह्यांची कबुली

अभियंता प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी आमदार प्रशांत ठाकूर भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर; पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन


4kNews कामोठे 26

पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांची भाजपच्या अभियंता प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची जबाबदारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर सोपविण्यात आल्याने पनवेलसह रायगड जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.


भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या विविध प्रकोष्ठांची पुनर्रचना करण्यात आली असून, त्याअंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर अभियंता प्रकोष्ठाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अभियंता, तांत्रिक क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच व्यावसायिकांना पक्षाच्या विचारांशी जोडण्यासाठी आणि त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग समाजहिताच्या विविध उपक्रमांसाठी करण्याच्या दृष्टीने या प्रकोष्ठाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


 आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघासह रायगड जिल्ह्यात पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले आहे. संघटनात्मक कौशल्य, कार्यकर्त्यांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क आणि विकासकामांचा व्यापक अनुभव असल्यामुळे त्यांना प्रदेश चिटणीस आणि आता अभियंता प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी जबाबदारी सोपविण्यात आली.  राज्यातील अभियंता व तांत्रिक क्षेत्रातील विविध घटकांना भाजपच्या संघटनात्मक प्रवाहात सहभागी करून घेत, त्यांच्या माध्यमातून विकासाभिमुख विचारांना चालना देण्याचे काम अभियंता प्रकोष्ठाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रकोष्ठाचे राज्यातील कार्य अधिक प्रभावी आणि व्यापक होणार असून या नियुक्तीबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचे भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच अभियंता क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत असून, नव्या जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top