नवीन बातम्या
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना

रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

4kNews कामोठे दि. 6
पनवेल | प्रतिनिधी : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष – युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमध्ये वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, साडी वाटप तसेच वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचा समावेश आहे. 


कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता वृक्षारोपणाने होणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता रा. जि. प. शाळा, वडघर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ होईल. दुपारी ४ वाजता गुरु लिंगेश्वर शाळा, पनवेल येथे आणखी एका गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.


सायंकाळी ५ वाजता पनवेल गेस्ट हाऊस येथे साडी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्यानंतर सायंकाळी ७ वाजता समबाई नगर, प्रबुद्ध बुद्ध विहार, वडघर येथे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमांचे आयोजन शरद कांबळे, निलेश कांबळे, प्रशांत सोनवणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top