4k सामाचार दि. 21
मुंबई | राज्यात तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 15,631 पोलीस भरती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

गृह विभागाने जारी केलेल्या शासननिर्णयानुसार, पोलीस शिपाई 12,399, चालक 234, बॅण्डस्मन 25, सशस्त्र शिपाई 2,393 आणि कारागृह शिपाई 580 पदे भरण्यात येणार आहेत.
ही भरती 2024-25 दरम्यान रिक्त झालेल्या तसेच होणाऱ्या पदांसाठी करण्यात येणार आहे. परीक्षेचे स्वरूप OMR पद्धतीचे असेल.

खुल्या प्रवर्गासाठी शुल्क ₹450,
मागास प्रवर्गासाठी शुल्क ₹350 ठेवण्यात आले आहे.
याशिवाय, दोन वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एकवेळ संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
