4k समाचार दि. 21
पुणे | अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि समाजसुधारक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज १२ वर्षे पूर्ण झाली. २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणातील न्यायालयीन लढ्याला आजही पूर्णविराम मिळालेला नाही. न्यायालयाने दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असली तरी उर्वरित तिघांना पुराव्या अभावी निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

डॉ. दाभोळकर यांच्या हत्येनंतर राज्यात अंधश्रद्धेविरोधातील चळवळ अधिक तीव्र झाली. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध समाजघटकांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात येत असून न्यायासाठीचा संघर्ष अजूनही सुरूच आहे
