4k समाचार दि. 21
मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती, वाहतुकीतील अडथळे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

बैठकीदरम्यान पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची सविस्तर माहिती घेण्यात आली. पूरस्थिती नियंत्रण, नागरिकांची सुरक्षितता, अडकलेल्या लोकांचे स्थलांतर, वाहतूक व्यवस्थापन तसेच आपत्कालीन सेवांची कार्यवाही यावर विशेष भर देण्यात आला.

मंत्री जाधव-पाटील यांनी गरजेच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) ची पथके तातडीने पाठवावीत, अशा स्पष्ट सूचना दिल्या.
