4k समाचार दि. 21
पनवेल शहरातील सावित्री पेट्रोल पंपावर अल्पवयीन मुलाला हवा भरण्यासाठी ठेवल्याप्रकरणी मालक मंजयकुमार राय यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुकान निरीक्षक गजानन जोंधळे यांनी केलेल्या पाहणीत हा प्रकार उघडकीस आला. १३ वर्षीय मुलाने स्वतःचे वय सांगितल्यानंतर चौकशी केली असता, मालकाकडे मुलाच्या वयाबाबत कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत.
