4k समाचार दि. 21
नवी मुबंई शहरात पाणी साचलेले नाही, असा दावा आयुक्तांनी केला होता. मात्र, सामाजिक कार्यकर्ते अनरजित चौहान यांनी या दाव्याची पोलखोल केली आहे.

चौहान यांनी सांगितले की, नाल्यांमधील उंचीतील फरक आणि नाल्यांच्या मार्गात बांधलेल्या झोपड्यांमुळे पाणी साचत आहे. विशेषतः वाशी सेक्टर २९ आणि तुर्भे एपीएमसी मार्केट परिसरातील नाल्यांजवळ उभारलेल्या झोपड्यांवर कारवाई न केल्याने परिस्थिती गंभीर होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करून नाले मार्ग मोकळे करावेत, अशी मागणी चौहान यांनी केली आहे.
