4k समाचार
मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. ही बैठक तब्बल 50 मिनिटे चालली. बैठकीत राज्यातील नागरिकांच्या विविध समस्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत असली तरी या भेटीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

राज ठाकरे काही वेळातच पत्रकार परिषद घेणार असल्याने त्यांच्या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होणार का, याबाबत राजकीय विश्लेषकांनी कयास बांधायला सुरुवात केली आहे.
