4k समाचार दि. 16
कामोठे : सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत कामोठे रहिवाशी सामाजिक सेवा संस्था, ओम शिव शंकर सेवा मंडळ कामोठे आणि जय हरी महिला मंडळ कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने बीड व शेवगाव येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत अभियान राबविण्यात आले.
या उपक्रमाचे मार्गदर्शन संस्थापक अध्यक्ष पोपट शेट आवारी यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास सहा लाख रुपये मूल्याच्या दोन गाड्या जीवनावश्यक वस्तू गरजू शेतकऱ्यांना पाठवण्यात आल्या.

या उदात्त कार्यात कामोठेतील अनेक महिलांनी पुढाकार घेतला. सुवर्णा वाळुंज, वर्षा चौधरी, प्रमिला आहेर, गीता उंडे, रंजना ढवन, प्रीती खिलारी, संजना वाघमारे, सुप्रिया माने, सुरेखा गुंजाळ, संगीता पवार, पुष्पा पोटे, उषा आवारी, साबळे ताई, सत्रे ताई, सुजाता चेडे, मनीषा वनवे, शारदा तोंडे, विनंती आंधळे, रंजना शिंदे, लता मोरे, ज्ञानेश्वर सत्रे, शोभा डेरे, ज्योती शिकारे, मंगल आवारी, शुभांगी कड, सुनिता वाबळे, रोहिणी डेरे, जाधव ताई, वनिता वाबळे, पल्लवी आवारी या सर्व कार्यकर्त्यांनी कामोठ्यात फिरून वस्तू गोळा केल्या आणि त्यांचे व्यवस्थित पॅकिंग केले.

पुरुष कार्यकर्त्यांमध्ये दादाभाऊ वाळुंज, संदीप पोटे, योगेश चौगुले, अनिल पोटे, रवी बोहोत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच पोपटशेठ आवारी, सुरेश ढवन, आत्माराम आरोटे, बाबाजी ढोमे यांनी स्वतः बीड व शेवगाव येथे जाऊन वस्तू प्रत्यक्ष गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या.
या उपक्रमामुळे स्थानिक नागरिक आणि बीड-शेवगाव येथील ग्रामस्थांनी मंडळाच्या या मानवतावादी कार्याचे मनापासून कौतुक केले.

मंडळाचे अध्यक्ष पोपटशेठ आवारी यांनी सांगितले,
“जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी संकटात असताना आपण त्याच्यासाठी मदतीचा हात पुढे केला, हेच आमच्यासाठी खऱ्या अर्थाने दिवाळीचे समाधान आहे.”
हा उपक्रम समाजातील ऐक्य, दयाभाव आणि सहकार्य याचे उत्तम उदाहरण ठरला असून कामोठेकरांच्या सामाजिक संवेदनशीलतेचा गौरव करणारा क्षण ठरला आहे.
