4k समाचार दि. 15
नवी मुंबई – महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळाने (MIDC) केलेल्या भूसंपादनाला अन्यायकारक ठरवत तळोजा परिसरातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाने आता अधिक तीव्र रूप धारण केले आहे. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी चिंद्रन गावातील महिलांनी पाण्यात उभे राहून आपला तीव्र संताप व्यक्त केला.
सहभागी महिलांपैकी काहींची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकार आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, भूसंपादन करताना योग्य मोबदला आणि पुनर्वसनाची हमी न दिल्याने त्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
