4k समाचार दि. 15
ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) – रेल्वे ट्रॅक ओलांडण्याच्या प्रयत्नात तुषार नावाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तो बाईकवरून दादरी रेल्वे ट्रॅकजवळ आला होता. रेल्वे येण्यास अजून वेळ असल्याचे समजून त्याने ट्रॅक पार करण्याचा प्रयत्न केला, मात्र बाईक घसरल्याने तो रुळांवर पडला.
स्वतःला सावरण्यापूर्वीच समोरून आलेल्या गाडीने त्याला जोरदार धडक दिली, ज्यामुळे तुषारचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे.
