पनवेल दि.21 जुलै 4k समाचार महाकाली चॅरिटेबल ट्रस्ट व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल महानगर संघटक श्री. गुरुनाथ पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने बेलपाडा, खारघर येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटपाचा उपक्रम नुकताच उत्साहात पार पडला.

या उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख श्री. शिरीष घरत यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा उपक्रम अत्यंत आनंददायक ठरला.

कार्यक्रमावेळी उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर संघटक गुरुनाथ पाटील, शहर प्रमुख गुरु म्हात्रे, शहर समन्वयक रामचंद्र देवरे, उपशहर प्रमुख जनार्दन कोळी, विभाग प्रमुख उत्तम मोर्बेकर, विभाग संघटक संतोष गुजर, शाखा प्रमुख संतोष कट्टीमणी, उपशाखा प्रमुख महादेव हिमणे तसेच शाळेचे मुख्याध्यापक दिक्षित सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

हा उपक्रम विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करताना त्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण करणारा ठरला असून, सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
