महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 288 पैकी 231 जागांवर महायुती विजयी झाली, तर महाविकास आघाडीला केवळ 45 जागांवरच विजय मिळाला.

या निकालानंतर अजित पवार गटाकडून शरद पवार यांचा राजकारणातून सन्यास घेण्यावर चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीच्या दारुण पराभवामुळे शरद पवार यांचे भवितव्य काय, अशी विचारणा आता राजकारणात होत आहे. महायुतीच्या विजयामुळे राज्याच्या राजकारणाला नवे वळण आले आहे.
