महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी लागणाऱ्या 29 जागा कोणत्याही पक्षाला मिळाल्या नाहीत.

ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 16, तर शरद पवार गटाला फक्त 10 जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर अतिआत्मविश्वासाने लढलेल्या मविआला मोठा धक्का बसला.

महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला, तर मविआला विरोधी पक्षनेत्याविनाच विधानसभेत बसण्याची नामुष्की ओढवली आहे. यामुळे यंदा विधानसभा विरोधी पक्षनेत्याविनाच.
