पनवेल दि. १८4k News संजय कदम ( वार्ताहर ) : पनवेल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, प्लॉट नं. २९ येथे रहात असणाऱ्या संतोष कांबळे यांनी बांगलादेशी, रोहिंगे या बेकायदेशीर स्थलांतरितांना उप भाडेपट्ट्याने जागा दिली अशा प्रकारची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली आहे. जर त्यामध्ये सत्यता असती पोलिसांनी कारवाई केली असती. मात्र तसे काही न घडता संबंधिताला त्रास दिला जात आहे. त्यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या वरच कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक रमेश गुडेकर यांनी केली आहे.

पनवेल-को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, बंदर रोड, जुना पनवेल-४१०२०६ येथील प्लॉट नं. २९ येथे संतोष उत्तम कांबळे राहतात. ते गेल्या अनेक वर्षांपासून येथे वास्तव्य आहे. दरम्यान या मालमत्तेचे ते केअरटेकर असल्याचे रमेश गुडेकर यांनी सांगितले. या ठिकाणी बेकायदेशीर रित्या बांगलादेशी ,रोहिंगे उप भाडेतत्त्वावर ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी पनवेल शहर पोलिसांकडे देण्यात आले आहेत.

जर अशा प्रकार होत असेल तर पोलिसांनी कारवाई का केली नाही. संबंधित ठिकाणी छापे मारून बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक का केली नाही. तसेच कांबळे यांना यांच्यावरही गुन्हा का दाखल केला नाही. असा सवाल माजी नगरसेवक गुडेकर यांनी केला आहे. याचा अर्थ एक खोटी तक्रार असून संबंधितांवर दिशाभूल केले म्हणून कायदेशीर कारवाई करावी. त्याचबरोबर कांबळे यांना नाहक त्रास दिला जात असल्याचे ते म्हणाले. ही जागा अत्यंत मोक्याची असून बिल्डरांची नजर आहे. परिणामी ती मोकळी करून येथे इमारत बांधण्याचा डाव आहे. त्यामुळेच संतोष कांबळे यांना खोट्या तक्रारी करून त्यांना तिथून हलवण्याचा डाव असल्याचा आरोप रमेश गुडेकर यांनी केला आहे.
