राज्यात महायुतीच्या सत्तास्थापनेला विलंब होत असल्याने आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. छगन भुजबळ यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीला फटका बसल्याचा ठपका ठेवत जुन्या वादांना उजाळा दिला.

शिवसेना शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील यांच्या विधानांवरही भुजबळांनी टीका केली. सत्तास्थापनेसाठी भाजप नेते व्यस्त असल्याने विलंब होत असून लवकरच स्थिर सरकार स्थापन होईल, असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला.
