पुण्यातील सोमवार पेठेत मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, या कारणावरून पत्नीने पतीला लाटणं आणि मिक्सरच्या भांड्याने बेदम मारहाण केली

. चिडलेल्या पत्नीने पतीच्या करंगळीला चावा घेत नख तोडले आणि तोंड, गाल, पोटावर ओरखडे काढले. या घटनेमुळे घाबरलेल्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. ४४ वर्षीय पतीने आपल्या ४० वर्षीय पत्नीविरोधात त्रिशुंड गणपती मंदिराजवळील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना एक डिसेंबर रोजी रात्री घडली.
