महायुतीच्या आगामी शपथविधीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

महायुतीने या निवडणुकीत मोठा विजय मिळवून बहुमत सिद्ध केले आहे. या निमंत्रणामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून ठाकरे बंधू शपथविधीसाठी उपस्थित राहणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे.
