पनवेल, दि.4 (4kNews) ः वकील दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजतर्फे नामांकित वकील मनोज भुजबळ यांना सर्टीफिकेट देवून गौरविण्यात आले आहे.

अॅड.मनोज भुजबळ यांनी आतापर्यंत केलेल्या कामााचे रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजचे प्रेसिडंट रो.विजय गोरेगावकर, सचिव रो.रुपेश यादव, व्होकेशनल डायरेक्टर रो.काशिराम पाटील, डिस्ट्रीक्ट गर्व्हनर रो.शितल शहा, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर रो.मधुमिता बर्वे आदींनी कौतुक करून वकील दिनाचे औचित्य साधून त्यांना सर्टीफिकेट देवून त्यांचा गौरव केला आहे.
