आज दिनांक ११ मे २०२५ रोजी, करंजाडे शहरामध्ये शिवसेना करंजाडे शहर विभागातर्फे देशासाठी शहीद झालेल्या जवानांना अत्यंत श्रद्धेने आणि कृतज्ञतेने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना करंजाडेच्या वतीने करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक सेक्टर ५, करंजाडे, या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. विनोदजी साबळे साहेब, उरण विधानसभा सचिव श्री. हितेश नाईक, तालुका संपर्क प्रमुख बाळाराम नाईक साहेब ,करंजाडे विभागप्रमुख श्री. नाथाभाई भरवाड, शहर संपर्क प्रमुख श्री. चंद्रकांत गुजर, शहरप्रमुख श्री.मिरेंद्र शहारे, शहर संघटक श्री स्वप्नील मोरे, महिला शहरप्रमुख सौ.अंजु सिंह, पंचायत समिती प्रमुख श्री. बाळासाहेब अवारी,

उपशहरप्रमुख श्री. वसंत सोनवणे, श्री. प्रल्हाद कुंभार, श्री. अक्षय टिके, अजित कदम, शहर सचिव श्री. सचिन कदम, शाखाप्रमुख श्री. दिनेश धामनस्कर, श्री. राजाभाऊ नलावडे, श्री. नितीन कुंभार, श्री. ज्वलासिंह देशमुख, श्री. जयेश पटेल, श्री. गणेश वालझाडे, श्री. जयराज गणिगा, श्री. विश्वनाथ शेट्टी, श्री. संचित मोरे, श्री. संदीप पारठे, श्री. तुलसी गौतम, श्री. लीलाधर म्हात्रे, श्री. अरुण कंबीरे, कार्यकर्ते, पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्वांनी दोन मिनिटांचे मौन पाळून शहीदांच्या बलिदानास अभिवादन केले. उपास्थितांनी हातात तिरंगा घेऊन ‘भारत माता की जय’ आणि ‘जय जवान, जय हिंद’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमवून टाकला.

कार्यक्रमाच्या शेवटी ‘वंदे मातरम्’च्या घोषात श्रद्धांजली समारंभ समाप्त झाला. या कार्यक्रमातून करंजाडे शहरातील नागरिकांनी देशप्रेमाची आणि शहीदांविषयी कृतज्ञतेची जाणीव प्रकट केली.
