4k समाचार दि. 15
उलवे – युनिव्हर्स कराटे मार्शल आर्ट अकॅडमी इंडियाच्या वतीने आयोजित अखिल भारतीय खुल्या कराटे स्पर्धेत उलवे नोडमधील रामशेठ पब्लिक स्कूलच्या कराटेपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शाळेतील प्रिनल भालेराव आणि मोहम्मद इफराज शेख या विद्यार्थ्यांनी काटा प्रकारात उत्तम प्रदर्शन करत कांस्य पदक पटकावले.

या यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच व्हाइस चेअरमन वाय. टी. देशमुख यांनी कराटेपटूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
या वेळी शाळेचे प्राचार्य किरणकुमार सुथार, क्रीडा प्रशिक्षक मंदार मुंबईकर आदी मान्यवर उपस्थित होते. कराटेपटूंच्या या यशामुळे शाळेचा गौरव वाढला आहे.
