4k News
उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )तिसरी महामुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील उरण, पेण आणि पनवेल या ९५ गावांच्या जमिनीवर सध्या गब्बर लोकांचा डोळा असताना या परिसरामध्ये एक गुंठा एक प्लॉट अशा जाहिरातींना बळी पडून पर राज्यातील आणि काही बांगलादेशी नागरिकांचे उरण पूर्व विभागामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीचे व्यवहार सुरू आहेत . परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उरण तालुका अध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांनी मागितलेल्या माहितीनुसार बऱ्याच खरेदी झालेल्या दस्त नोंदणीमध्ये राजस्थान राज्यातील वाळवंट भागातील भूमी प्रमाणपत्र एडिटिंग करून खोटे शेतकरी असल्याचे दाखले जोडून नोंद केल्या जात आहेत.

परंतु याकडे महसूल विभागाचा सुद्धा कानाडोळा असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये होत आहे. नोंद करण्यासाठी तलाठी,सर्कल मोठ्या प्रमाणात रसद घेत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. सर्वसामान्य जनतेला जमीन घ्यायचे असेल तर त्याला शेतकरी असल्याचा दाखला लागतो. मग परराज्यातील येणाऱ्यांवर एवढी मेहरबानी का केली. असा सवाल सत्यवान भगत यांनी उपस्थित केला आहे.

या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिष्ट मंडळातील मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर, उरण तालुका अध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांनी दुय्यम निबंधक यांच्याशी चर्चा करून त्यांनी मिळवलेल्या माहितीच्या अधिकाऱ्याखाली माहितीचे प्रत कसे खोटे दाखले आहेत हे समोरासमोर दाखवून दिले.जमिनी खरेदी विक्री संदर्भात होणाऱ्या चुकीच्या गोष्टी तातडीने थांबवण्यात याव्यात. अन्यथा आम्हाला हायकोर्टामध्ये जनहितासाठी याचिका दाखल करावी लागेल.असा इशारा सत्यवान भगत यांनी प्रशासनाला दिला आहे.
