4k समाचार दि. 21
नवी मुंबई | एक्सप्रेस हायवेवर आज सकाळी झालेल्या अपघातात तब्बल आठ जण जखमी झाले. धोकादायक पद्धतीने बस उभी करून प्रवाशांना उतरवत असताना मागून आलेल्या कारने बसला जोरदार धडक दिली. या अपघातात दावला हडवळे गंभीर जखमी झाले असून इतर सात जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.

जखमींमध्ये विमल हडवळे (५७), अशोक हडवळे (३७), दिपाली हडवळे (३५), अर्णव हडवळे (११), संतोष हडवळे (३५), अरुण डावखर (३५) आणि आरती डावखर (२८) यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
