नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

गुळसुंदे येथे गौराई पूजनाचा सोहळा उत्साहात पारंपरिक जल्लोषात



4k समाचर  दि. 2
गुळसुंदे : श्रद्धा, सौंदर्य आणि परंपरेचा अनोखा संगम मानला जाणारा गौराई पूजनाचा सोहळा सोमवारी गुळसुंदे गावात मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. चिंतामण कडवे यांच्या निवासस्थानी गेल्या ७० वर्षांपासून अखंड परंपरेने गौरी-गणपतीचे आगमन होत असून, यावर्षीही या परंपरेला उजाळा मिळाला. 



गौराई पूजन हा केवळ धार्मिक विधी नसून स्त्रियांच्या एकत्र येण्याचा, पारंपरिक संस्कृती जपण्याचा आणि सामूहिक ऐक्य व्यक्त करण्याचा उत्सव मानला जातो. महिलांनी या दिवशी सकाळपासून घरची सजावट, पूजा साहित्याची तयारी यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. घरात फुलांनी व पारंपरिक अलंकारांनी गौराईचे स्वागत करण्यात आले. विविध प्रकारचे नैवेद्य, लाडू, पुरणपोळी, मोदक, खोबरं-पातोळे अशा पदार्थांनी गौराईचा नैवेद्य सजवण्यात आला. 



पूजेनंतर गावातील महिलांनी मंगलाष्टकं, ओव्या व पारंपरिक गाणी गाऊन वातावरण भारावून टाकले. महिलांचे पारंपरिक पेहराव, शृंगार आणि घराघरातली भक्तिभावाची रंगत गावकऱ्यांच्या दृष्टीसही आनंददायी ठरली. या उत्सवात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील महिला सहभागी झाल्या होत्या.



गेल्या सात दशकांपासून कडवे कुटुंबियांच्या माध्यमातून ही परंपरा अखंड सुरू असून, गुळसुंदे गावातील प्रत्येक घराला तिचे वेगळे आकर्षण आहे. स्थानिक ग्रामस्थांनीही या पूजन सोहळ्यात सहभागी होत श्रद्धेने गौराईचे दर्शन घेतले.
गौराई पूजनाच्या या पारंपरिक सोहळ्यामुळे गुळसुंदे गावात भक्ती, उत्साह आणि स्त्रीशक्तीच्या ऐक्याचे दर्शन घडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top