केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची दिल्लीत बैठक झाली. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपद व मराठा मतांच्या समीकरणावर चर्चा झाली.

अमित शाह यांनी तावडेंकडून मराठा समाजाची भूमिका समजून घेतली. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री केल्यास मराठा मते कशी टिकवता येतील, यावर चर्चा झाली, मराठा चेहऱ्याऐवजी दुसरा चेहरा दिल्यास मतांवर होणाऱ्या परिणामांची गणिते मांडली गेली. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांनी आपण नाराज नसून जनतेसाठी काम करत राहणार असल्याचे स्पष्ट केले.
