काळ्या रंगाच्या स्कूटीवर आलेल्या दोन इसमांनी ४८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्यांच्या चेन हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

२४ नोव्हेंबर रोजी चेंबूर मुंबई येथील अनुराधा पाठक या भाजीपाला घेण्यासाठी डी. मार्ट परिसरात पायी गेल्या होत्या. भाजीपाला घेऊन परत येत असताना सिडको बिल्डिंगच्या समोरील मुख्य रस्त्यावर सेवन इलेव्हन शॉपच्यासमोर सेक्टर १७, रोडपाली, कळंबोली येथे रात्री सव्वा नऊच्या सुमारास आल्या असता, दोन इसमांनी गळ्यातील अडीच तोळ्यांची चेन लांबवली.
