नवीन बातम्या
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्तपदी मयुर भुजबळ ; पदभार स्वीकारला

‘रामबाग’ उद्यानाचा रविवारी वर्धापनदिन सोहळा

पनवेल(प्रतिनिधी) दुबईतील ‘मिरॅकल गार्डन’ च्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावे खाडी येथे असलेल्या ‘रामबाग’ या निसर्गरम्य उद्यानाच्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी श्री. सत्यनारायण महापूजा व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेल विधासभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी, विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.


  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारी अशी ‘स्वर्गसुख आनंद देणारी रामबाग’ साकारली आहे. १४ एकर जागेतील या ‘रामबाग’ उद्यानात भव्य आणि सुरेख प्रवेशद्वार, निसर्गरम्य हिरवळीसह विविध प्रकारच्या फुलझाडांच्या असंख्य विविध रचना, तलाव, विद्युत रोषणाई, पदपथ, चिरेबंदी बांधकाम, आसन व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळणी, पाळणे, डबल हर्ट आणि स्टोन सेल्फी पॉंईंट, मचवा, पाण्याचे कारंजे, अशा सर्व बाबी आकर्षक आणि मनमोहक आहेत.

सायकांळी या उद्यानाचे रूप बदलते, त्यावेळी असणारी विद्युत रोषणाई अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटणारी आहे. त्यामुळे राज्यातील निसर्गप्रेमी या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देत आहेत. न्हावेखाडी येथे म्हसेश्वर मंदिर येथे अतिसुंदर असलेल्या या रामबाग उद्यानाच्या

वर्धापनदिनानिमित्त सायंकाळी ५. ३० वाजता श्री. सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद तर रात्री ०८ वाजता पंचम निर्मित व गणेश भगत प्रस्तुत सुप्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ अर्थात पॅडी कांबळे आणि सोबत ७० कलाकारांचा संच असलेला ‘महाराष्ट्राचे आम्ही मराठी’ हा पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम होणार असून प्रवेश विनामूल्य आहे. या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रामबाग व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सागर ठाकूर, श्री. म्हसेश्वर मंदिर कमिटी अध्यक्ष सि. एल. ठाकूर, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top