नवीन बातम्या
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी नीलेश सोनावणे यांची सलग सातव्यांदा

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा पनवेल शासकीय विश्रामगृहात पार पडली. यावेळी २०२५ च्या.अध्यक्षपदी सर्वानुमते पनवेल युवा चे संपादक जेष्ठ पत्रकार निलेश सोनावणे यांची सलग सातव्यांदा निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्ष पदी राम बोरीले ,उपाध्यक्ष पदी गणपत वारगडा, तर सचिवपदी शंकर वायदंडे, खजिनदार पदि राजेंद्र कांबळे  यांची सर्वानुमते  निवड करण्यात आली.


गेली सहा वर्षे पनवेल तालुका पत्रकार समितीचा पदभार सांभाळत अनेक सामाजिक उपक्रम राबवित असल्याने पुन्हा एकदा अध्यक्ष पद घ्यावे अशी सभासद व सदस्यांची इच्छा असल्याने सातव्यांदा निलेश सोनावणे यांच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ  टाकण्यात आली 


,यावेळी निलेश सोनावणे यांनी पुन्हा एकदा सातव्यांदा आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले व नवीन वर्षात नाविन्यपूर्ण उपक्रम सर्वांच्या सहकार्याने राबविण्यात येतील तसेच लवकरच पुढील वर्षांच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात येईल असेही  सांगितले. यावेळी पनवेल तालुका  पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, कार्याध्यक्ष पदी राम बोरीले ,उपाध्यक्ष पदी गणपत वारगडा, तर सचिवपदी शंकर वायदंडे, खजिनदार पदी राजेंद्र कांबळे, अण्णा साहेब आहेर आदींसह उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top