पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः दरवर्षीप्रमाणे यंदाही सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनी तर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यामध्ये शनिवार दि.15 फेब्रुवारी 2025 रोजी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व डॉ.नैना पटेल यांचे महिला आरोग्य मार्गदर्शन, सायं.4 ते 8 या दरम्यान. रविवार दि.16 फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजक कच्छ युवक संघ पनवेल सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत तसेच सायंकाळी 6 ते 10 या दरम्यान

मराठमोळा पोवाडा व शाहिरी गीतांचा कार्यक्रम सादरकर्ते रायगडभूषण, शिवभूषण मराठमोळा शाहिर वैभव घरत, सोमवार दि.17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 ते 8.30 चित्रकला स्पर्धा, मंगळवार दि.18 फेब्रुवारी वक्तृत्व स्पर्धा सायंकाळी 7 ते 10, बुधवार दि.19 फेब्रुवारी रोजी सकाळी शिवप्रतिमेचे पूजन व शिववंदना, त्यानंतर भजन, मान्यवरांचे स्वागत व सत्कार, हरिपाठ, शिवप्रतिमेची शाही मिरवणूक, गुणगौरव बक्षिस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम मराठा भवन सेक्टर 9 खांदा वसाहत येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
