4k समाचार दि. 7
पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे कोट्यवधी भाविकांचे दैवत आहे , महाराष्ट्रातील या महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळाला ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे इष्ट दैवत आहे. पनवेल मधून लाखो भाविक पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी च्या चरणी नतमस्तक व्हायला जातात . त्यामुळे पनवेल ते पंढरपूर अशी रेल्वे सेवा सुरु केल्यास रेल्वे विभागाच्या महसुलात तर वाढ होईलच शिवाय आमच्या पनवेल रायगड ,नवी मुंबई च्या जनतेस पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनास जाण्यासाठी सुलभ प्रवास होईल याकरिता पनवेल ते पंढरपूर रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी रेल्वे विभागाकडे केली आहे .

आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्र एकादशी या एकादशीला देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक विठ्लाच्या दर्शनासाठी जात असतात त्याच प्रमाणे काही भाविक दर आठवड्याला दर्शनासाठी जातात,विठ्ठलाच्या भाविकांना आठवड्यातून किमान दोन वेळा तरी रेल्वे पनवेल ते पंढरपूर रेल्वे सेवा सुरु केल्यास दर्शनासाठी सुलभ रित्या जात येईल याकरिता पनवेल ते पंढरपूर रेल्वे सुरु करावी अशी मागणी रिपाई पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले ,केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव , रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे केली आहे
