4k समाचार दि. 20
पनवेल (प्रतिनिधी) कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धा २०२५” या स्पर्धेच्या शाळा अंतर्गत फेरीचा पारितोषिक वितरण सोहळा आज (दि. १८) नविन पनवेल येथील सी. के. ठाकूर इंग्रजी माध्यम विद्यालय येथे उत्साहात पार पडला. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक व समकालीन विषयांवर प्रभावी वक्तृत्व सादर केले. विचारशक्ती, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुणांचा सुंदर संगम विद्यार्थ्यांच्या भाषणातून अनुभवायला मिळाला.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल घरत, माजी नगराध्यक्ष संदिप पाटील, सांस्कृतिक सेलचे जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मुख्याध्यापिका निलीमा शिंदे, शिक्षक आदी उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रभावी वक्तृत्वाचे कौतुक करताना त्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. सी. के. ठाकूर विद्यालयाचे इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी आपल्या मनोगतात, “विद्यार्थ्यांना अशा स्पर्धांमुळे आत्मविश्वास व सर्जनशील विचारांची प्रेरणा मिळते. कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांनी दिलेली ही संधी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे,” असे सांगत संस्थेचे विशेष आभार मानले. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संपूर्ण सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
