नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

जनता विद्यामंदिर, अजिवली येथे वाहतूक नियम व सायबर सुरक्षेबाबत प्रबोधन


  4k समाचार पनवेल, दि. 7 (संजय कदम)
नवीन पनवेल वाहतूक शाखेतर्फे जनता विद्यामंदिर, अजिवली (ता. पनवेल, जि. रायगड) येथे विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियम आणि सायबर सुरक्षा विषयावर प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.



या कार्यक्रमात व. पो. नि. सकपाळ आणि HC वाघ यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम समजावून सांगत सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व अधोरेखित केले.
त्यांनी विद्यार्थ्यांना —

1. गाडी चालवताना सीट बेल्टचा वापर करावा,
2. दारू पिऊन वाहन चालवू नये,
3. लेन कटिंग करू नये,
4. वाहन चालवताना मोबाइल फोन वापरू नये,
5. उलट्या दिशेने वाहन चालवू नये,
6. रस्त्यावर वाहन पार्क करू नये,
7. आणि लायसन्स मिळेपर्यंत कोणतेही वाहन चालवू नये — अशी महत्त्वाची सूचना दिली.
विद्यार्थ्यांना या नियमांचे पालन स्वतः करावे आणि आपल्या पालकांनाही याची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले. 



तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी माहिती देण्यात आली. इंटरनेट वापरताना घ्यावयाची काळजी, सायबर गुन्ह्यांचे प्रकार, तसेच सायबर हेल्पलाइन 1930 याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
याशिवाय POCSO कायदा, बालविवाह प्रतिबंध कायदा, आणि बालविवाहाचे दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच पोलीस मदतीसाठी 112 हेल्पलाइन क्रमांकाबद्दलही विद्यार्थ्यांना अवगत करण्यात आले.
या प्रबोधन सत्रास सुमारे 160 विद्यार्थी व शिक्षकवर्ग उपस्थित होते.
कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top