नवीन बातम्या
राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत सी.के.टी. महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक
इनर व्हील क्लब ऑफ पनवेल. डिस्ट्रिक्ट ३१३; सीमेवरील जवानांसोबत रक्षाबंधन
धुतुममध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात रात्रभर नामस्मरण, भजनाने भक्तिमय वातावरण; अनेक वर्षांची परंपरा कायम
नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या प्रभारीपदी रेवणसिद्ध ठेंगले
गणेशोत्सव मंडळांना खांदेश्वर पोलिसांचा ‘शिस्तीचा डोस’ मंडप, ध्वनिक्षेपक व मिरवणुकीबाबत सूचना; २३ मंडळांना बीएनएसएस कलम १६८ अंतर्गत नोटीस
वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई
पळस्पे फाटा ते कोन फाटा रस्त्याची पाहणी
जिल्हा परिषदेच्या डेरवली शाळेत शिक्षक दिन व गोपाळकाला साजरा
श्री क्षेत्र पळसदरी स्वामी समर्थ मठात अभिनेते विजय पाटकर यांचा सत्कार

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई


4kNews कामोठे
पनवेल, दि. 6सप्टेंबर : पनवेल शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात पनवेल शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने संयुक्त विशेष मोहीम राबविण्यात आली.



शनिवारी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अनिल गेळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी फ्रंट सीट बसविणे, गणवेश न घालणे, मीटरप्रमाणे रिक्षा न चालविणे तसेच अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली.



या मोहिमेत एकूण १६६ रिक्षांवर कारवाई करून २ लाख ७७ हजार ६५० रुपयांचा दंड आकारण्यात आला. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अशा विशेष तपासणी मोहिमा यापुढेही सुरू राहणार असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top