4kNews कामोठे
९ सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याचे आश्वासन
पनवेल, दि. 6 (वार्ताहर) : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर पळस्पे फाटा ते कोन फाटा मार्गाची पाहणी करण्यात आली. पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान रस्त्याची स्थिती, वाहतूक कोंडी आणि सुरू असलेल्या कामाबाबत संबंधित कंत्राटदारांशी चर्चा करण्यात आली. कंत्राटदार रोहित मलिक यांनी ९ सप्टेंबरपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करून मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. काम वेळेत पूर्ण झाल्यास या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होऊन वाहनचालक व नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

