नवीन बातम्या
राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत सी.के.टी. महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक
इनर व्हील क्लब ऑफ पनवेल. डिस्ट्रिक्ट ३१३; सीमेवरील जवानांसोबत रक्षाबंधन
धुतुममध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात रात्रभर नामस्मरण, भजनाने भक्तिमय वातावरण; अनेक वर्षांची परंपरा कायम
नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या प्रभारीपदी रेवणसिद्ध ठेंगले
गणेशोत्सव मंडळांना खांदेश्वर पोलिसांचा ‘शिस्तीचा डोस’ मंडप, ध्वनिक्षेपक व मिरवणुकीबाबत सूचना; २३ मंडळांना बीएनएसएस कलम १६८ अंतर्गत नोटीस
वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई
पळस्पे फाटा ते कोन फाटा रस्त्याची पाहणी
जिल्हा परिषदेच्या डेरवली शाळेत शिक्षक दिन व गोपाळकाला साजरा
श्री क्षेत्र पळसदरी स्वामी समर्थ मठात अभिनेते विजय पाटकर यांचा सत्कार

गणेशोत्सव मंडळांना खांदेश्वर पोलिसांचा ‘शिस्तीचा डोस’ मंडप, ध्वनिक्षेपक व मिरवणुकीबाबत सूचना; २३ मंडळांना बीएनएसएस कलम १६८ अंतर्गत नोटीस


4kNews कामोठे
पनवेल, दि. 6 (वार्ताहर) : गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, यासाठी खांदेश्वर पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत विविध सूचना केल्या. खांदा कॉलनीतील खान्देश हॉल येथे झालेल्या बैठकीला सुमारे ५० ते ६० मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.



मंडप उभारताना जागामालक तसेच संबंधित विभागांच्या आवश्यक परवानग्या घेणे आणि शासनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. गणेशमूर्तीच्या सुरक्षेसाठी मंडपात दिवसरात्र स्वयंसेवक तैनात ठेवण्यासोबतच सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या.



ध्वनिक्षेपकासाठी न्यायालयाच्या नियमांचे पालन करावे. तसेच डीजे, डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटचा वापर टाळावा, असे स्पष्ट करण्यात आले. देखावे व फलकांवर आक्षेपार्ह मजकूर नसावा, दर्शनासाठी महिला-पुरुषांच्या स्वतंत्र रांगा ठेवाव्यात आणि मिरवणुका शक्यतो रस्त्याच्या एका बाजूने काढाव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्या.



विसर्जनासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची आरटीओकडून तपासणी करून घेणे व चालकाचा परवाना तपासणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, २३ गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना बीएनएसएस कलम १६८ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली असून, उर्वरित मंडळांनाही नोटिसा देण्यात येणार आहेत.
बैठकीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्यासह खांदेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top