4k समाचार दि. 20
पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय आणि सेवाव्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०५ वाजता पनवेलमध्ये ‘युवा संवाद मेळावा’ आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला राज्याचे माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड.आशिष शेलार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

देशाचे कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आले असून या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत युवकांच्या पुढील वाटचालकिरता ‘विकसित भारत विकसित महाराष्ट्र’ या शिर्षकाखाली युवा संवाद मेळावा पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात होणार आहे. यावेळी पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
